
गुगलने अखेर गुगल सर्च डेस्कटॉपवर डार्प मोड आणले आहे. त्यामुळे आता ब्राईट वेब पेजेस ग्रे रंगामध्ये बदलता येईल. याआधी गुगलने अँड्रॉईड आणि आयओएसवर डार्प थीम रोलआऊट केलेली आहे. आता कंपनीने गुगल सर्च डेस्कटॉपसाठी ही थीम रोलआऊट केली.
डार्प थीमसाठी सर्वात आधी वेब पेजच्या उजव्या बाजूला जाऊन सेटिंगवर क्लिक करावे लागेल. डाव्या बाजूला ऑपियरन्सवर क्लिक करून डिव्हाईसला डिफॉल्टमध्ये डार्प किंवा लाईट मोड करावे लागेल. हव्या त्या सेटिंग करून झाल्यानंतर सेव्ह बटणवर क्लिक करावे लागेल. गुगलने डार्प मोड फिचरची चाचणी फेब्रुवारी महिन्यातच सुरू केली होती. मात्र युजर्सला हे फीचर तत्काळ मिळणार नाही., असे कंपनीने सांगितले.

























































