
सर्च इंजिन म्हणून संपूर्ण जगभरात लोकप्रिय असलेल्या गुगलने आता फिटनेस ट्रकर मार्केटमध्ये दंड थोपटले आहेत. स्मार्टवॉचसारख्या स्मार्ट उपकरणांची निर्मिती करणारी फिटबिट कंपनी 2.1 अब्ज डॉलर म्हणजेच तब्बल 14,846 कोटी रुपयांमध्ये विकत घेण्यास गुगल तयार झाले आहे. हा व्यवहार पूर्ण करून सॅमसंग आणि अॅपल यांसारख्या बडय़ा कंपन्यांना गुगल टक्कर देणार आहे.गुगल आणि फिटबिट कंपनीने शुक्रवारी या व्यवहाराची घोषणा केली. गुगलने सध्या आपल्या मुख्य व्यवसायाबाहेर साम्राज्य निर्माण करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. दुसरीकडे फिटबिट कंपनीपुढे अॅपल कंपनीचे मोठे आव्हान आहे. अॅपलशी स्पर्धा करताना दमछाक झाल्यामुळे फिटबिटने गुगलपुढे कंपनी खरेदीचा प्रस्ताव मांडला आहे.




























































