गुगल देणार भूकंपाचा इशारा

सध्याच्या काळात तंत्रज्ञानाने मोठी भरारी घेतली असली तरी भूपंपाचा अचूक इशारा मिळताना दिसत नाही. गुगल या तंत्रज्ञान जगतातील दिग्गज कंपनीने आता याकडे मोर्चा वळवला आहे. अमेरिकेच्या काही भागांत भूपंप अलर्ट फीचर दिल्यानंतर लवकरच अन्य देशांतही ते सुरू होणार आहे. हिंदुस्थानात हे फीचर कधी सुरू होणार याबाबत गुगल कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

सध्यातरी गुगलचा भूपंप अलर्ट अँड्रॉईड मोबाईलधारकांसाठी उपलब्ध होईल. अमेरिकेनंतर ग्रीस आणि न्यूझीलंड देशांसाठी भूपंप अलर्ट फीचर सुरू करण्यात येईल. अॅंड्रॉईड युजरकडे हे अॅलर्ट फीचर बंद आणि सुरू ठेवण्याचा पर्याय असेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आयओएस मोबाईलधारकांना ही सुविधा मिळेल. गुगलने पहिल्यांदा ऑगस्ट 2020मध्ये भूपंपाबद्दल इशारा देणारे फीचर सुरू केले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात वॉशिंग्टनमध्ये आलेल्या भूपंपाचा इशारा गुगलच्या माध्यमातून मिळालेला होता.

आपली प्रतिक्रिया द्या