
जर तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोन किंवा इतर कोणतेही गुगल डिव्हाईस वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गुगल ही आज आपली गरज बनली आहे. गुगल आपल्या अनेक आवश्यक सेवांच्या बदल्यात वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटाविषयी माहिती ठेवतो. पण, तुम्हाला माहीत आहे का? गुगल डिव्हाईस वापरकर्त्यांवर गुगलची नेहमीच नजर असते. गुगल आपल्या वापरकर्त्यांच्या जवळपास सर्वच अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवतो. आपण कोणत्या वेबसाइटला कधी भेट दिली आणि आपण कोणत्या गोष्टींची ऑनलाइन शॉपिंग केली हे गुगलला माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला गुगलशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.
तुम्ही केव्हा कुठे होता, हे गुगलला माहीत आहे
इंटरनेट आणि वेबवर तुम्ही जे काही सर्च करता याची गुगल नोंद करतो. जेव्हा आपण Google Chrome मधून साइन इन करता, तेव्हा त्या गोष्टीची गुगल अधिक नोंद ठेवतो. यामध्ये त्यासर्व गोष्टींचा समावेश आहे ज्या तुम्ही अॅप आणि इंटरनेटच्या माध्यमाने सर्च करता. गुगल वापरकर्त्याच्या लोकेशन हिस्ट्रीच्या डेटात अॅक्सेस करू शकतो. यामुळे गुगलला हे माहीत असत की तुम्ही कोणत्या दिवशी किती वाजता कुठे होता. गुगल त्या सर्व डिव्हाईसवर लक्ष ठेवतो, ज्यात तुम्ही गुगल अंकाउंटने लॉग इन करता.
YouTube हिस्ट्री आणि असिस्टंट कमांडला करतो स्टोर
गुगल तुमच्या व्हॉइस आणि ऑडिओ ऍक्टिव्हिटीवर ही लक्ष्य ठेवून आहे. गुगल असिस्टंटवर तुम्ही जीही कमांड देता गुगल ती आपल्याकडे स्टोर करून ठेवतो. गुगल असिस्टंटवर तुम्ही काही म्हणाला तरी ते ट्रॅक करून स्टोर केलं जात. तसेच YouTube वर आपण काय सर्च करता आणि कोणते व्हिडीओ पाहता याची डेटाही हिस्ट्रीही गुगल आपल्याकडे स्टोर करून ठेवतो.
ऑनलाईन शॉपिंगचीही असते माहिती
तुम्ही ऑनलाईन कोणत्या गोष्टीची खरेदी करता यावरही गुगलचे लक्ष असते. तुम्ही एखादी वस्तू, विमानाचे तिकीट, यात्रा, येणारे बिल आणि इतर महत्त्वाच्या वैयक्तिक माहितीबद्दल देखील गुगल संपूर्ण माहिती ठेवतो. आजच्या काळात गुगलच्या सेवा प्रत्येकासाठी आवश्यक बनल्या आहेत. मात्र वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटा लीक होण्याच्या वाढत्या घटना पाहता याबाबत जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.




























































