
गुंज ही स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रिय व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉक यांनी एकत्र येऊन वंचितांना हिवाळ्यापासून संरक्षण देण्यासाठी ‘प्रेड द वॉर्म्थ’ ही मोहीम सुरू केली आहे. कडाक्याची थंडी पडत असताना लोकांनी त्यांचे नवे-जुने लोकरीचे कपडे गरजूंना मायेची ऊब देण्यासाठी दान करावे यासाठी गुंजने टिकटॉकसोबत मोहीम सुरू केली आहे. ‘प्रेड द वॉर्म्थ’ची सुरुवात 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे. तेव्हापासून टिकटॉकवर 575 दशलक्ष प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला आहे. मोहिमेचा संदेश देण्यासाठी गुंजतर्फे टिकटॉकवरून देणगीच्या टीप्स देणारे व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत. इच्छुक दानशूर त्यांची देणगी किंवा वस्तू गुंजच्या विविध केंद्रात देऊ शकतील. समाजाला विशेषतŠ तरुणांना सामाजिक उद्दिष्टांसाठी एकत्र आणण्याचा हा उपक्रम असल्याचे गुंजचे संस्थापक अंशू गुप्ता यांनी सांगितले.

























































