वादग्रस्त वक्तव्य करणारे गोपीचंद पडळकर भाजप प्रवक्ते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकर टीका  करून भाजपला अडचणीत आणणारे आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजपचे पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  भाजपने दहा प्रवक्ते व पॅनलिस्टच्या नावाची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत असे खालच्या पातळीवरील वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या वक्तव्याकरून भाजपचे नेते अडचणीत आले होते. मात्र भाजपने त्यावेळेस पडळकर यांच्या वक्तव्यापासून हात झटकले होते.  पण आता त्यांच्यावरच पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दहा प्रवक्ते व 23 पॅनलिस्टची नियुक्ती केली. दहा प्रवत्त्यांमध्ये खासदार भारती पवार, आमदार राम कदम, राहुल नार्वेकर, शिवराय कुलकर्णी, एजाज देशमुख, भालचंद्र शिरसाट, राम कुलकर्णी आणि श्वेता शालिनी यांचा समावेश आहे.