गोरेगाव येथे सुसाट वेगातील मोटरसायकलने विजेच्या खांबाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. राधेशाम दावंडे, विवेक राजभर, रितेश सालवे अशी त्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी आरे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
राधेशाम, विवेक आणि रितेश हे तिघे आरे कॉलनी येथे राहत होते. शुक्रवारी रात्री ते मोटरसायकलने आरे कॉलनी येथून गोरेगावच्या दिशेने जात होते. राधेशाम हा मोटारसायकल चालवत होता. तर विवेक आणि रितेश हे मागे बसले होते. राधेशाम हा सुसाट वेगात दुसरा मंडा येथून जात होता. त्याचे मोटरसायकलवरचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. काहीच वेळात आरे पोलीस घटनास्थळी आले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. राधेशाम आणि विवेकला डॉक्टरांनी मृत घोषित केले.