
मानवसेवा हीच ईश्वर सेवा समजून गोरेगाव पूर्व येथील श्री दत्त देवस्थानच्या वतीने गुरूदत्त सेवा मंडळ शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, उपविभागप्रमुख सुधाकर देसाई यांच्या सहकार्याने मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या रकमेतून दरवर्षी गरजूंना मदतीचा हात देते. त्यानुसार यंदाही गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, ज्येष्ठांना छत्री वाटप, दिव्यांगांना व्हील चेअर अशा अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र आडिवरेकर यांनी दिली.
दत्तजयंतीनिमित्त उद्या मंगळवारी येथे पालखी मिरवणूक, महाआरती आणि महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, मंडळाच्या वतीने वर्षभर देवस्थानाच्या माध्यमातून पॅन्सरग्रस्त रुग्ण आणि हृदयविकाराच्या रुग्णांना मदतीचा हात दिला जातो.

























































