
रायगड व रत्नागिरी जिह्यातल्या शहरी भागातील गुन्हेगारी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, पण त्यातील सुमारे 359 कॅमेऱ्यांपैकी 116 सीसीटीव्ही पॅमेरे बंद पडले असल्याची कबुली मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
रायगड व रत्नागिरी जिह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी 50 टक्के कॅमेरे बंद पडल्याबाबत पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत भाग घेताना शिवसेनेचे गट नेते भास्कर जाधव यांनी रत्नागिरीतील बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यावेळी सरकारने रत्नागिरीत डीपीडीसीच्या फंडातून 57 पॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यातील 20 पॅमेरे फक्त सुरू असून 37 पॅमेरे बंद पडले आहेत तर खोपोलीतील 44, पेणमधील 14, अलिबागमधील 21 पॅमेरे बंद पडल्याची माहिती दिली.