जीएसटीतून सरकारने कमावले 2.37 लाख कोटी

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीतून सरकारची घसघशीत कमाई झाली आहे. एप्रिल 2025 मध्ये सरकारने जीएसटीतून 2.37 लाख कोटी रुपये कमावले आहेत. हे आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटीतून मिळालेले उत्पन्न आहे. जीएसटीत वार्षिक आधारावर 12.6 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी मे 2024 मध्ये सरकारने 1.73 लाख कोटी रुपयांचा जीएसटी वसूल केला होता, तर मार्च महिन्यात जीएसटीतून 1.96 लाख कोटी रुपये मिळाले होते.