
केंद्र सरकारने डिसेंबर 2025 पर्यंत देशातून टीबी हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र यात यश आलेले नाही. उलट टीबीचे रुग्ण वाढले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांमध्ये टीबी रुग्णांमध्ये दीडपट वाढ झाली आहे. 2020 साली टीबी रुग्णांची संख्या 1805670 होती. 2024 मध्ये ही संख्या 2617923 झाली. आरटीआयमधून ही माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन (एनटीईपी) कार्यक्रमांतर्गत 2025 या वर्षापर्यंत टीबी निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पेंद्रीय क्षयरोग विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी ऑक्टोबरपर्यंत टीबी रुग्णांची संख्या 2077 591 पर्यंत पोहोचली आहे. 2020 मध्ये 1805670, 2021 मध्ये 2135830, 2022 मध्ये 2422121, 2023 मध्ये 2552257 आणि 2024 मध्ये ही संख्या 2617923 होती. म्हणजेच एक लाख लोकसंख्येवर ही वाढ 2020 मध्ये 131 रुग्ण, 2021 मध्ये 153 रुग्ण, 2022 मध्ये 172, 2023 मध्ये 179 आणि 2024 मध्ये ही संख्या 183 व 2025 मध्ये 196 रुग्ण एवढी झाली. आरटीआयनुसार, महाराष्ट्रात टीबी रुग्णांची संख्या मागील पाच वर्षांत दीड लाखाच्या खाली गेलेली नाही. महाराष्ट्रात जून 2025 पर्यंत 115303, तर 2024 या वर्षात 230163 रुग्णसंख्या होती.




























































