ट्रेंड – जीपीएसने दाखवला चुकीचा रस्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक 70 वर्षीय महिला ऑनलाईन मॅपच्या मदतीने एका पत्त्याचा शोध घेत होती. पत्ता शोधता शोधता ती थेट रेल्वे रुळांवर जाऊन पोहोचली. या महिलेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही घटना अमेरिकेत सिएटल येथे घडली. हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. व्हिडीओ  aplasticplant  या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही वृद्धा जीपीएसच्या  मदतीने मार्ग शोधत Mount Baker Station   परिसरापर्यंत पोहोचली. मात्र, ती इतकी गोंधळली होती की, आपली कार रेल्वे रुळांवर धावत आहे याचेही तिला भान राहिले नाही. तिने जवळपास पाव मैल अंतर रेल्वे ट्रकवरून कार चालवली. अखेर सुरक्षारक्षकांनी तिला थांबवले आणि तेव्हा तिला आपली चूक लक्षात आली.