हिंगोलीत पालावरच्या घरट्यांना शिवसेनेचा मायेचा घास

860

हिंगोली शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तंबु ठोकून पन्नासच्यावर कुटुंब राहतात. दररोज मोलमजुरी करायची व  आवश्यक अन्नधान्य आणून  खायचे हा दिनक्रम या कुटुंबीयांचा आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे रोज मजुरीचे काम मिळत नसल्याने या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. या कुटुंबीयांनी शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या निवासस्थानी धाव घेऊन गावाकडे जाण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. मात्र, हिंगोली जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असल्याने नागरिकांना जिल्ह्याबाहेर पाठवने शक्य नव्हते. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व  आमदार संतोष बांगर यांनी तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, रवा, मैदा, डाळ, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था केली आणि पालावरील या कुटुंबियांना 15 दिवस पुरेल एवढे अन्नधान्य वाटप केले.

यापुढेही मदतीची गरज भासली तर पालावरच्या कुटुंबीयांना शिवसेना मदत करण्यास तत्पर असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार व  संतोष बांगर यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील बांगर यांनी केले आहे. या मदत वाटप प्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक श्रीराम बांगर, रत्नाकर बांगर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या