परिचारिकांबद्दल कृतज्ञता उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जागतिक परिचारिका दिनानिमित्त वोक्हार्ट ग्रूप हॉस्पिटल्सच्या वतीने सुमारे 103 परिचारिकांना सन्मानित केले. मीरा रोड तसेच इतर भागातील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवीत परिचारिका दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता आठवडाभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या वर्षीचा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा व्हॉइस टू लीड (नेतृत्वाचा आवाज) या संकल्पनेवर आधारित होता. भविष्यातील आरोग्यसेवेसाठी एक दृष्टी ठेवत कोणत्याही परिस्थितीत अविरत रुग्णसेवा करण्याचे वचन यावेळी देण्यात आले.