चारधाम यात्रा वाहनांसाठी ग्रीन कार्ड आवश्यक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील चारधाम यात्रा सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी 30 मार्चपासून व्यावसायिक वाहनांसाठी ग्रीन कार्ड बनवणे सुरू करण्यात आले आहे. चारधाम यात्रा मार्गावर व्यावसायिक वाहन म्हणजेच बस, टॅक्सीसाठी ग्रीन कार्ड एक अनिवार्य दस्तावेज आहे. या कार्डद्वारे माहिती होते की, हे वाहन आणि त्याचा चालक डोंगराळ रस्त्यांवर चालण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. ग्रीन कार्डाशिवाय, कोणत्याही वाहनांना ऋषिकेशहून पुढे यात्रा मार्गावर जाण्याची परवानगी दिली जात नाही. परिवहन विभागाने वाहनांसाठी तीन प्रमुख ठिकाणी नोंदणी आणि तपासणी केंद्रे तयार केली आहेत. यात ऋषिकेश, हरिद्वार आणि नारसन बॉर्डर या तीन ठिकाणांचा समावेश आहे. गर्दी टाळण्यासाठी परिवहन विभागाने ऑफलाइन सोबत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध केली.