
थोर समाजसुधारक, साहित्यिक व संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील अग्रणी, झुंजार पत्रकार केशव सीताराम ठाकरे तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी दादर येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या वेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, विभागप्रमुख – आमदार महेश सावंत, उपनेते मिलिंद वैद्य, उपनेत्या विशाखा राऊत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभागसंघटक श्रद्धा जाधव, माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, चंद्रकांत झगडे, जितेंद्र सकपाळ आदी उपस्थित होते.
























































