
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही तासांमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर तीन ग्रेनेड हल्ले झाले आहेत. श्रीनगरमधील फतहकदल आणि बादशाह पुल भागामध्ये सीआरपीएफच्या वाहनांना निशाणा बनवून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये चार जवान जखमी झाले आहेत. जवानांसह एक नागरिकही या हल्ल्यामध्ये जखमी झाला आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सीआरपीएफला टार्गेट करून झालेल्या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
#JammuAndKashmir: In third attack on CRPF in a span of few hours, another grenade lobbed on CRPF troop at Srinagar’s Magarmal Bagh. No injury reported. More details awaited. pic.twitter.com/PFm36wVa2p
— ANI (@ANI) June 2, 2018
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी फतहकदल येथे सीआरपीएफच्या ८२ व्या बटालियनला निशाणा बनवत ग्रेनेड हल्ला केला. यात तीन जवान आणि एक नागरिक जखमी झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सीआरपीएफ गाडीवरील दगडफेक प्रकरण, गौतमचा सत्ताधाऱ्यांपुढे ‘गंभीर’ पर्याय
दुसरीकडे बादशाह पुल भागामध्ये झालेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला, तर मागर्मल बाग परिसरात झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. शुक्रवारपासून आतापर्यंत श्रीनगरमध्ये पाच हल्ले झाले असून या सर्व हल्ल्यांची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
जखमी जवानाचा मृत्यू
पुलवामामध्ये मंगळवारी (२९ मे) झालेल्या हल्ल्यातील जखमी पोलिसाचा आज (शनिवार) मृत्यू झाला. आकिब अहमद असे या पोलिसाचे नाव असून दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करून गोळी झाडली होती. याचा व्हिडीओही दहशतवाद्यांनी जारी केला होता. दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर आकिब यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते, त्याठिकाणी त्यांचा एक पाय कापावा लागला होता. परंतु गंभीर जखमी आकिब यांचा शनिवारी मृत्यू झाला.
Aqib Ahmad, Special Police Officer (SPO) who was injured in an attack by terrorists at a police station in Pulwama’s Kakapora on May 29, succumbed to his injuries at 92 Base Hospital in Srinagar #JammuAndKashmir pic.twitter.com/hzlIgKNRdw
— ANI (@ANI) June 2, 2018























































