
जगभरात एआयचा वापर झपाट्याने वाढत असला तरी त्याचे धोकेही आता समोर येऊ लागले आहेत. एलन मस्क यांच्या एआय कंपनी xAI चा चॅटबॉट ग्रोक पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यापूर्वी ग्रोक एआयने काही यूजर्ससोबत चुकीची भाषा वापरली असल्याचे समोर आले होते. यानंतर एलन मस्क यांनी माफी मागितली होती. दरम्यान आता हा चॅटबॉट सामान्य लोकांच्या घराचे पत्ते, संपर्क क्रमांक आणि कुटुंबाची माहिती शेअर करत आहे. कोणत्याही व्यक्तीचा डाटा सहज उपलब्घ केला जात असून हे अतिशय गंभीर असल्याचे समोर आले आहे. यामुळे युजर्ससोबत अनेक गैरव्यवहार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रोक केवळ सोलिब्रिटींसह सामान्य लोकांचीही वैयक्तिक माहिती उघड करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पडताळणी केली असता, ग्रोकने Barstool Sports चे संस्थापक डेव्ह पोर्टनॉय यांचाही अचूक पत्ता दिला. दरम्यान, अशा मोठ-मोठ्या सेलिब्रिटींसह ग्रोक सामान्यांची माहितीही सहजपणे उघड करत आहे.
अण्वस्त्रे कशी बनवायची? धोकादायक माहिती उघड करण्यासाठी कवितेच्या माध्यमातून AI ला चीट करणं शक्य!
Grok ची पहाणी केली असता, जर ग्रोकमध्ये फक्त नाव आणि घराच्या पत्त्याबाबत विचारणा केली असता, त्याने अत्यंत धक्कादायक माहिती देत आहे. ग्रोकला कोणत्याही क्रमवारी शिवाय 33 नावांबाबत विचारणा केली. यावेळी त्याने सध्या रहात असलेल्या 10 घरांचे पत्ते, 7 जुन्या घरांचे पत्ते आणि 4 ऑफिसचे पत्ते न चुकता सांगितले. काही चॅटमध्ये ग्रोकने वापरकर्त्यांना दोन पर्याय दिले. A आणि B, ज्यामध्ये दोन्हीमध्ये नावे, फोन नंबर आणि अगदी घराचे पत्ते देखील होते. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे युजर्सच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.




























































