कुत्रा बांधल्याचा विचारला जाब; नवरदेवाला मारहाण

लग्नाच्या मंडपाला कुत्रा बांधल्याचा जाब विचारणाऱ्या नवरदेवाला शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना शीळ-डायघरमधील भोईर कंपाऊंड येथे घडली आहे. त्यानंतर याप्रकरणी शीळ-डायघर पोलिसांनी परस्परविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

नवरदेव भावेश लोलगे (27) याचे 31 मे रोजी लग्न होते. त्यामुळे त्यांच्या आजीच्या घरासमोर मंडप बांधला होता. त्या मंडपाला विशाल म्हात्रे यांनी कुत्रा बांधला होता. त्या कुत्र्याने मंडप फाडल्याप्रकरणी नवरदेव भावेश 1 जून रोजी जाब विचारायला गेला. त्यावेळी विशाल यांची पत्नी दर्शना हिने उलट नवरदेवालाच शिवीगाळ केली. उगाचच शिवीगाळ करू नको असे म्हटले असता कुत्रामालक विशाल याने नवरदेवाच्या डोक्यात लाकडी दांडका मारला. त्यानंतर विशाल आणि त्यांचा भाऊ अविनाशने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी परस्पर गुन्हे दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस या घटनेचा सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत