
पुण्यातील भूजल तज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांना प्रतिष्ठsचा समजला जाणारा ‘आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिकेतील ओक्लाहोम विद्यापीठातील वॉटर सेंटरकडून प्रायोजित केला जाणारा हा पुरस्कार असून हा पुरस्कार मिळवणारे कुलकर्णी हे भारतीय उपखंडातील पहिलेच शास्त्रज्ञ ठरले आहेत. हा पुरस्कार दर दोन वर्षांनी दिला जातो.
डॉ. हिमांशू कुलकर्णी यांना विशेष कार्यक्रमात ‘आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार’ देण्यात आला. मानचिन्ह आणि रोख 25 हजार डॉलर्स म्हणजेच 22 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हिंदुस्थानातील भूजल संसाधनांशी निगडित संकटावर मात करायची असेल तर भूजल व्यवस्थापनावर काम करणे हाच पर्याय आहे, असे डॉ. हिमांशू कुलकर्णी म्हणाले.