मोफत अन्नछत्र चालवणाऱया धार्मिक स्थळांना जीएसटी माफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मोफत अन्नछत्र चालवणाऱया धार्मिक स्थळांसाठी केंद्र सरकार ‘सेवा भोज’ योजना सुरू करणार आहे. अन्न शिजवण्यासाठी घेण्यात आलेल्या वस्तूंचा जीएसटी या योजनेंतर्गत त्यांना परत केला जाणार आहे. त्यासाठी ३२५ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचे वृत्त ‘मनीकंट्रोल डॉट कॉम’ने दिले आहे.

अमृतसरमधील सुवर्णमंदिरासारखी अनेक धार्मिक स्थळे तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने लोकांसाठी मोफत अन्नछत्र चालवण्यात येते. त्यांना जेवण बनवण्यासाठी तूप, साखर, भाजीपाला, तेल अशा वस्तू मोठय़ा प्रमाणावर लागतात. त्यांचा आर्थिक बोझा कमी करण्यासाठीच या वस्तूंवरील केंद्राचा आणि राज्याचा जीएसटी त्यांना परत केला जाणार आहे. देशातील बहुतांश गुरूद्वारांमध्ये लंगर सेवा चालवली जाते. तिथे येणाऱया प्रत्येकासाठी मोफत जेवण दिले जाते.