गुजरातमध्ये भाजप आमदाराला कोरोनाची लागण, लोकप्रतिनिधीला कोरोना होण्याची तिसरी घटना

640

गुजरातमध्ये भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. नरोदाचे आमदार बलराम थवानी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राज्यात एका लोकप्रतिनिधीला कोरोनाची होण्याची ही तिसरी घटना आहे.

आमदार बलराम थवानी सातत्याने जनतेमध्ये जात होते. सोशल मीडियावर ते तसे फोटोही टाकत होते. गरीबांना अन्न आणि मास्क देताना त्यांचे फोटो होते.

त्यांना सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह निघाली आहे. गुजरातमध्ये एका लोकप्रतिनिधीला कोरोनाची लागण होणे ही पहिलीच घटना नाही. या पूर्वी काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे रिपोर्ट येण्यापूर्वी खेडावाला मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना भेटले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांना क्वारंटाईन व्हावे लागले होते.

इतकेच नाही तर गुजरातमध्ये काँग्रेस नगरसेवकाचा मृत्यूही झाला होता. अहमदाबाद महानगरपालिकेचे नगरसेव बद्रुद्दीन शेख यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या