गुजरातमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला, एक जण मृत्युमुखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात येथे बांधकाम सुरू असलेला पूल कोसळून एक जण दगावल्याची घटना घडली आहे. गुजरातच्या पालनपूर येथे ही घटना घडली आहे. रेल्वे क्रॉसिंगवर ओव्हरब्रीज बांधत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

पालनपूरचे जिल्हाधिकारी वरुण बरनवल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालनपूर येथे रेल्वे क्रॉसिंगवर या ओव्हर ब्रीजचं बांधकाम सुरू आहे. सध्या या ठिकाणी दोन खांबांना जोडणारा गर्डर टाकण्यात आला आहे. अचानक सोमवारी त्याचा काही भाग कोसळला आणि त्याखाली दबून एका माणसाचा मृत्यू झाला आहे. अद्याप दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. दगावलेल्या व्यक्तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, अशी माहिती बरनवल यांनी दिली आहे.

नेमक्या कोणत्या कारणामुळे हा पूल कोसळला, याचा तपास करण्यात येत आहे. तज्ज्ञांची समिती गांधीनगरहून येथे दाखल झाली असून त्यांच्या अहवालानंतरच त्याची स्पष्टता होईल, असं सांगण्यात येत आहे.