‘गल्ली बॉय’ ऑस्करला जाणार

399
gully-boy-poster

‘अपना टाइम आयेगा’ असे म्हणत तरुणाईच्या मनावर गारूड घालणाऱया ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे. 92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाच्या अधिकृत एण्ट्रीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या चित्रपटाचा प्रीमियर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता, तर मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘गल्ली बॉय’च्या नावावर आहे.

एफएफआय अर्थात फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शनिवारी याबाबतची घोषणा केली. चित्रपटाचे निर्माता फरहान अख्तर यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे.यंदाच्याच फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. यंदा ऑस्करसाठी 27 चित्रपट स्पर्धेत होते. परंतु, सर्वसहमतीने ‘गल्ली बॉय’ची निवड करण्यात आली. चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, विजयराज, कल्की कोचलिन, सिद्धांत चतुर्वेदी, विजय वर्मा आणि अमृता सुभाष यांनी अभिनय केला आहे. दिर्गदर्शन जोया अख्तर यांचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या