पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार, एकजण जखमी

पुण्यातील शिवाजीनगर मुख्यालयात ड्युटीवर असताना महिला कर्मचाऱ्याशी वाद झाल्यानंतर मानसिक तणावातून कर्मचाऱ्यांने स्वतः वर गोळी झाडून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यास गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटे ही घडली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल बेंडाळे असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलीस शिपाई बेंडाळे आणि सस्ते शिवाजीनगर मुख्यालयात नेमणुकीस आहेत. क्वार्टर गेट येथे ते सस्ते आणि एक महिला कर्मचारी रात्रपाळीस ड्युटीवर होते. त्यावेळी सस्ते आणि महिला कर्मचारी यांच्यात वाद झाले. वादात सस्ते याना मानसिक ताण आल्यामुळे त्यांनी स्वतःवर गोळी गोळी झाडून घेण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रकार लक्षात येताच बेंडाळे यांनी त्यांना अडविले. अडवत असताना गोळी बेंडाळे याना लागली आहे. यात बेंडाळे जखमी झाले असून, त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. माहिती मिळताच शिवाजीनगर मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कोपणर यांनी धाव घेतली. नेमकी गोळी स्वतःवर झाडून घेण्याचा प्रयत्न का केला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या