
सामना ऑनलाईन । जयपूर
राजस्थानमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी गुर्जर आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. धौलपूरमध्ये आंदोलकांनी महामार्गावर रास्ता रोको केल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तसेच रेल्वे रुळांवर आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने रेल्वेसेवाही विस्कळीत झाली आहे. तसेच धौलपुरमध्ये महार्गावर आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली त्यानंतर आंदोलकांनी गाड्यांना आग लावली. पोलिसांनी जेव्हा आंदोलकांना रोखले तेव्हा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना हवे गोळीबार करावा लागला.
Rajasthan: Visuals from the site of the ongoing protest by Gujjar community in Sawai Madhopur. They are demanding 5% reservation. pic.twitter.com/NTT4QdCPG1
— ANI (@ANI) February 10, 2019
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलकांच्या दगडफेकीत 4 जवान जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या इस्पितळात दाखल केले आहे. तब्बल एक तासानंतर राष्ट्रीय महामार्गावरील आंदोलकांना हटवण्यात पोलिसांना यश आले. धौलपूरसह अजमेरमध्येही राष्ट्रीय महामार्ग आठ वर आंदोलकांनी रास्ता रोको केला. तसेच कोटा जयपूर महामार्गवरही आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.
Ajmer: Protestors block NH 8 in support of the ongoing reservation movement by Gujjar community. #Rajasthan pic.twitter.com/ZYBm0aqAJ2
— ANI (@ANI) February 10, 2019
आंदोलकांनी मलारनामध्ये मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावर गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या मांडला आहे. यामुळे कोटा विभागाच्या 55 गाड्यांच्या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 18 गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहे. रेल्वे अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलनामुळे उदयपूर ते हजरत निजामुद्दीन पर्यंतच चालणार्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.






















































