
हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघातील आघाडीचा फॉरवर्ड खेळाडू गुरजंत सिंगने शुक्रवारी नवी दिल्ली येथे झालेल्या हॉकी इंडिया पुरस्कार सोहळ्यात आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली.
दोन ऑलिम्पिक पदकांचा मानकरी असलेल्या 31 वर्षीय गुरजंतने हिंदुस्थानसाठी 130 सामन्यांत 33 गोल नोंदवले. 26 जानेवारी 1995 रोजी पंजाबमधील अमृतसरजवळील खैलारा येथे जन्मलेल्या गुरजंतला लहानपणापासूनच हॉकीची आवड होती. कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने या खेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली. गुरजंत सिंगला 2021 मध्ये ‘अर्जुन’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिकाa यांनी गुरजंतच्या योगदानाचे काwतुक करत म्हटले, ‘गुरजंत गेल्या दशकभर हिंदुस्थानी हॉकीचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याचा वेग, ऊर्जा आणि निर्णायक क्षणी गोल करण्याची क्षमता यामुळे तो प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक खेळाडू ठरला.’
कारकीर्दीतील ठळक क्षण!
n 2016 मध्ये झालेल्या ज्युनियर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गोल करत हिंदुस्थानच्या विजेतेपदात मोलाचा वाटा.
n 2017 मध्ये वरिष्ठ संघात पदार्पण.
n टोकियो ऑलिम्पिक 2020 आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक विजेत्या संघाचा सदस्य.
n2022 हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक.
n 2017 आशिया कप विजेता संघाचा भाग.





























































