149 वर्षानंतर दुर्मीळ योग, गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

येत्या 16 जुलैला गुरुपौर्णिमा असून याच दिवशी खग्रास चंद्रग्रहणही आहे. गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी येण्याचा योग तब्बल 149 वर्षानंतर जुळून आला आहे. याआधी असा योग 12 जुलै, 1870 ला आला होता.

मध्यरात्री 1 वाजून 32 मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाची सुरुवात होईल आणि पहाटे 4 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहणार आहे. हे चंद्रग्रहण हिंदुस्थानातून पाहता येणार आहे. हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि संपूर्ण युरोप खंडातून हे ग्रहण पाहता येणार आहे.