गर्लफ्रेंड्सना इम्प्रेस करण्यासाठी वाघमारे घालायचा खोटे सोन्याचे दागिने, मुलींवर करायचा पैसे खर्च

वरळीत गुरू सिद्धप्पा वाघमारे या व्यक्तीचा भोसकून खून करण्यात आला होता. आता त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. वाघमारे जे अंगावर सोनं घालायचा ते सर्व खोटं होतं. आपल्या गर्लफ्रेंड्सना इम्प्रेस करण्यासाठी वाघमारे हे खोटे दागिने घालायचा. इतकंच नाही तर आपली जी कमाई होती ती तो या मुलींवर खर्च करायचा. वाघमारेला बायको आणि मुलगा होता, पण तो घरी पैसे द्यायचा नाही अशी माहितीही समोर आली आहे.

वरळीतल्या सॉफ्ट टच स्पामध्ये रक्ताच्या थारोळ्यात वाघमारेचा मृतदेह सापडला होता. जेव्हा वाघमारे मेला तेव्हा त्याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोनं होतं. पण जेव्हा खोलवर तपास केला तेव्हा हे सोनं खोटं असल्याचं समोर आलं.

मिड डे या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार 2017 पासून वाघमारे हे खोटे दागिने घालत होता. दादरमधल्या एका दागिन्यांच्या दुकानातून वाघमारेने हे दागिने विकत घेतले होते. हे दागिने आगदी खऱ्या दागिन्यासारखे वाटायचे. वाघमारेच्या अनेक प्रेयसी होत्या. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी वाघमारे हे दागिने घालायचा वाघमारे जे काही पैसे कमवायचा तो आपल्या प्रेयसींवर खर्च करायचा.

ज्या भागात वाघमारे रहायचा तिथल्या लोकांसाठी वाघमारे हिरो होता. अंगावरचे दागिने आणि त्याच्या लाईफस्टाईलवरून तो खुप श्रीमंत असेल असे लोकांना वाटाचये. वाघमारे हा पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करायचा आणि खंडणीखोर म्हणून लोकांकडून पैसे उकळायचा.

वाघमारेने नुकतीच एक कार विकत घेतली होती. या गाडीचे तो महिन्याला 22 हजार रुपये हफ्ता भरायचा. वाघमारेचे अनेक बँकांमध्ये खाती होती, पण या खात्यांमध्ये काहीच पैसे नसल्याचे कळाले.

आपले वडिल घरी एकही पैसा देत नव्हते, जे काही पैसे ते कमावत ते त्यांच्या प्रेयसींवर खर्च करायचे अशी माहिती वाघमारेचा मुलगा रोहिदास वाघमारे याने दिली. घर चालवण्यासाठी रोहिदासने आपली बाईक विकली, तो सध्या बेरोजगार आहे. वडिल गेल्यानंतर मोठं कर्ज बाकी आहे असेही रोहिदासने म्हटलंय.