गुटखा घोटाळा, आरोग्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांच्या घरावर सीबीआयचे छापे

सामना ऑनलाईन, चेन्नई

तमिळनाडूमधील एआयएडीएमके सरकार मोठ्या अडचणीत सापडलं आहे. कोट्यवधी रुपयांच्या गुटखा घोटाळ्याप्रकरणी तिथले आरोग्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांच्या घरांवर, कार्यालयांवर सीबीआयने छापे मारले आहेत. सी.विजय भास्कर असं आरोग्यमंत्र्यांचे नाव असून पोलीस महासंचालकांचे नाव टीके राजेंद्रन असं आहे. राजकारण आणि पोलीस खातं यातील बड्या नावांविरोधात ही कारवाई सुरू झाल्याने तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

गुटखा घोटाळा आहे तरी काय ?

२०१३ साली तमिळनाडूमध्ये गुटख्याच्या निर्मिती,विक्री आणि साठवणुकीवर बंदी घालण्यात आली होती. तरीही गुटखा उत्पादक कोट्यवधींची लाच देऊन बिनधास्तपणे गुटखा निर्मिती, विक्री आणि साठवणूक करीत होते. याव्यतिरिक्त गुटखा कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात करही बुडवला आहे. करबुडवल्याप्रकरणी केलेल्या केलेल्या छापेमारीदरम्यान तपास यंत्रणांना बडे अधिकारी, नेते यांना लाच दिल्याचं कळालं होतं. त्याआधारे तपास पूर्ण केल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे.