
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने काल रात्री २०१८ रोजी शहरातील इतवारा भागातील चौफाळा येथे प्रतिबंधित असलेला ५ लाख ३८ हजार ३५० रुपयांचा गुटखा पकडला आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक पल्लेवाड, पोलीस कर्मचारी संजय पांढरे, ब्रम्हानंद लामतुरे, समीर, महिला पोलीस पोतदार आणि चालक मुंढे यांनी चौफाळा गाठले. तेथे एका घरात पोलिसांनी मोहंमद इम्रान मोहंमद अशरफ (२५) रा.गांधीनगर आणि विश्वंभर मारोतराव ठाकूर (४५) रा.मंढाई इतवारा या जणांच्या ताब्यात रजनीगंधा आणि इतर प्रतिबंधित गुटख्याचा साठा पकडला. या गुटखा साठ्याची किंमत ५ लाख ३८ हजार ३५० रुपये आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडलेले दोन जण गुटखा साथ इतवारा पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही इतवारा पोलीस करणार आहेत.

































































