
मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथे 2023 झाली घडलेल्या एका प्रकरणात न्यायालयाने दोषी महिलेला तिच्या मुलाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या महिलेने तिच्या पाच वर्षाच्या मुलाला घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले होते. यात त्याचा मृत्यू झाला होता.
ज्योती असे त्या नराधम मातेचे नाव असून तिचा विवाह पोलीस कॉन्स्टेबल ध्यान सिंग राठोड याच्यासोबत झाला होता. त्या दोघांना पाच वर्षांचा जतिन नावाचा मुलगा होता. दरम्यान ज्योतिचे तिच्या शेजारी राहणाऱ्या उदय इंदोलिया याच्यासोबत अनैतिक संबंध होते.
28 एप्रिल 2023 ला ध्यान सिंग कामावर गेलेले असताना उदय त्यांच्या घरी आला. तिथे ज्योती व त्याच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्याचवेळी जतिन ते सर्व दारातून बघत होता. ज्योतीला ते लक्षात येताच ती घाबरली. जतिन आपल्या वडिलांना सर्वकाही सांगेल या भितीने तिने त्याला दुसऱ्या मजल्याच्या बालकीनतून खाली फेकले. त्यानंतर जतिन पाय घसरून पडल्याचा तिने कांगावा केला. यात गंभीर जखमी झालेल्या जतिनला शेजारच्यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्युनंतर ज्योतीच्या वागण्यावरून ध्यानचंद यांना संशय येऊ लागला. त्यावेळी त्यांनी तिची चौकशी केली असता तिने तिचा गुन्हा कबूल केला.

























































