
Android यूझर्ससाठी पुन्हा एकदा मालवेअर हल्ल्याचा धोका वाढला आहे. यावेळी फेक सिस्टीम अपेडटद्वारे Android यूझर्सला फसवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. Android यूझर्स सिस्टम अपडेट समझून मालवेअरला आपल्या डिव्हाइसवर डाउनलोड करतात.
यानंतर या मालवेअरला यूझर्सच्या डेटाचा अॅक्सेस मिळतो. या डेटामध्ये WhatsApp आणि Telegram च्या कंटेंटचाही समावेश आहे. यासोबतच ब्राउझरच्या बुकमार्क, गॅलरीच्या इमेज वैगरेचा अॅक्सेस देखील मालवेअरला मिळतो.
सिक्युरिटी रिसर्च फर्म Zimperium च्या नुसार Android यूझर्सना मालवेअर इंस्टॉल करण्यासाठी सिस्टीम नोटिफिकेशन मिळते. हे सिस्टीम नोटिफिकेशन ओरिजनल नोटिफिकेशनशी बरेचसे मेळ खाते. म्हणून यूझर्स फसतात. हे इंस्टॉल केल्यावर यूझरच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर इंस्टॉल होतो.
या मालवेअरला अत्याधुनिक बनवण्यात येत आले आहे. यामुळे तुमच्या डिव्हाइसमध्ये कोणतीही माहिती आल्याबरोबर रियल टाइममध्ये डिव्हाइस ती माहिती गोळा करून सेंड करते. ते डिव्हाइसवर इंस्टॉल असते मात्र डिव्हाइसची सारी माहिती कमांड सेंटर पाठवत राहते. यामुळे हॅकर्सना यूझर्सचा अपडेटेड डेटा सतत मिळत राहतो. या मालवेअरमुळे आतापर्यंत किती डिव्हाइसमध्ये बिघाड झाला आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नेहमीप्रमाणे ही सिस्टीम अपडेट गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध नाही. त्याला इंस्टॉल करण्यासाठी यूझरला यावर मॅन्युअली क्लिक करावे लागते. तंत्रज्ञानाशी फारशी ओळख नसणारे यूझर पटकन या जाळ्यात फसू शकतात. ज्याला अशा प्रकारच्या तंत्रज्ञानासंदर्भात थोडी माहिती असली तरी देखील तो ही अपडेट ओळखून वेळीच थांबवेल. अँड्रॉइडमध्ये सिस्टीम डिफॉल्टमुळे अज्ञात अॅपचे इंस्टॉलेशन ऑफ असते. तुम्ही ते ऑन नसेल केले तर हा मालवेअर आपल्या डिव्हाइसमध्ये इंस्टॉल होऊ शकणार नाही.
यूझर्ससाठी महत्त्वाची माहिती म्हणजे अॅप नेहमी गूगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करण्यास सांगा. सिस्टीम अपडेट करताना नोटीफिकेशन अगदी बारकाईने पाहा आणि मग इंस्टॉल करा. थर्ड पार्टी अॅप कोणते अॅप इंस्टॉल करण्याची परमिशन मागत असल्यास त्याला मनाई करावी.























































