हजला जाणार 10,408 यात्रेकरू

343

हज यात्रेसाठीची 10 हजार 408 भाग्यवान यात्रेकरूंची नोंद करण्यात आली आहे. 28 हजार 712 यात्रेकरूंकडून या यात्रेसाठी अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी संगणकीय सोडतीद्वारे भाग्यवान यात्रेकरूंची निवड अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली.

राज्याला एकूण 12 हजार 349 इतका प्राथमिक कोटा प्राप्त झाला आहे. यामध्ये 70 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1 हजार 910 ज्येष्ठ इच्छूक यात्रेकरूंनी अर्ज केले आहेत. महिला राखीव प्रवर्ग 31 आहेत व खुला प्रवर्ग 10 हजार 408 असा आहेत. राखीव प्रवर्ग संख्या 1 हजार 941 जागा वगळता उर्वरीत एकूण 10 हजार 408 हज यात्रेकरुंकरिता आज संगणकीय सोडत (लॉटरी) काढण्यात आली.

राज्यातून निवड झालेले हज यात्रेकरु मुंबई, नागपूर, औरंगाबाद व हैद्राबाद या गंतव्य स्थानावरून (Embarkation point) या वर्षीच्या हज यात्रेस रवाना होणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी, केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ए. खान, कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी, महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या