हाफकिनच्या कॅण्टीनमधील 8 कामगार कोरोना पॉझिटिव्ह

परळ येथील हाफकिन संस्थेच्या कॅण्टीनमधील आठ कामगार एकाच वेळी पॉझिटिव्ह आढळल्याने कर्मचाऱयांमध्ये घबराट पसरली आहे. संस्थेच्या बायो-फार्मा विभागातील या कॅन्टीनमध्ये बहुतांश कर्मचाऱयांची रोज ये-जा असते. त्यातील बरेच जण या कामगारांच्या संपर्कात आले होते.

हाफकीन बायो-फार्मास्युटीकल्स विभागात ही कॅन्टीन आहे. बायो-फार्मामध्ये अधिकारी आणि कर्मचारी असे 400 जण काम करतात. कॅन्टीन कंत्राटावर चालवायला देण्यात आली आहे. तिथे 15 कामगार आहेत. पहाटे लवकरच त्यांचे काम सुरू होते. कॅन्टीन सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालू असते. क२न्टीन कामगारांना राहण्याची व्यवस्था जवळच करण्यात आली आहे. आठ कामगारांना एकाच वेळी कोरोनाची लागण कोणाच्या संपर्कामुळे झाली हे अद्याप समजलेले नाही. पण या कामगारांच्या रोज संपर्कात येणारे कर्मचारी मात्र धास्तावले आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून व्यवस्थापनाने कॅन्टीन 15 दिवस बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना औषधे व वैद्यकीय साहित्याचा पुरवठा हाफकीनच्या माध्यमातूनच केला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या