
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये आपल्यामुळे शस्त्रसंधी झाल्याचा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आता हमास या दहशतवादी संघटनेला आशा आहे. हमास आणि इस्रायल यांच्यात ते शस्त्रसंधी घडवून आणतील आणि गाझातील हल्ले थांबतील. त्यानंतर आम्ही शेवटचा जिवंत ओलीस अमेरिकन इस्रायली सैनिक एडन अलेक्झांडर याला सोडू असे आश्वासन हमासने दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे पुढच्या आठवडयात पश्चिम आशियाच्या दौयावर आहेत. त्याच्या आधी हमासने ही घोषणा केली असून एडन अलेक्झांडर यांना नेमके कधी सोडणार याबाबत काहीही सांगितले नाही. अलेक्झांडरचे शिक्षण आणि पालनपोषण अमेरिकेत झाले. अलेक्झांडरला 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने पकडून ओलिस ठेवले होते. दरम्यान, इस्रायलने रविवारी केलेल्या हल्ल्यात गाझापट्टीतील 16 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. यात मोठया संख्येने महिला आणि मुलांचा समावेश आहे.





























































