हमासने 24 ओलिसांना सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार दिवसांच्या युद्धविरामाला आजपासून सुरुवात झाली. गेल्या 49 दिवसांपासून इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष अखेर चार दिवसांसाठी थांबला. या करारांतर्गत हमासने थायलँडच्या 10 नागरिकांसह इस्रायलचे 13 आणि फिलिपाईन्सचा 1 अशा एकूण 24 ओलिसांना सोडले. या नागरिकांच्या बदल्यात इस्रायलने 39 पॅलेस्टिनी महिला आणि मुलांना सोडले आहे.