होय, मी ISI एजंट आहे, अभिनेत्याची जाहीर कबुली

3338

पाकिस्तानातील एका नावाजलेल्या अभिनेत्याने आपण पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा म्हणजेच ISI चा हस्तक असल्याची जाहीर कबुली दिली आहे. हमजा अली अब्बासी असे या अभिनेत्याचे नाव असून त्याने ट्विटरवरून ही कबुली दिली आहे. हिंदुस्थानातील काही वृत्तवाहिन्या या हमजा हा आयएसआयचा हस्तक असल्याचा दावा करत होती. या दाव्यांनंतर हमजा याने ही कबुली दिली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा एकदम खासम खास असलेल्या हमजाने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने म्हटलंय की “हिंदुस्थानातील वृत्तवाहिनी मी ISI चा अंडरकव्हर हस्तक आहे असा दावा करत आहे. ही गोष्ट चुकीची आहे  मी अंडरकव्हर नाही तर उघडपणे आयएसआय एजंट आहे, आणि मला याचा अभिमान वाटतो. फक्त मीच नाही तर पाकिस्तानातील 20 कोटी जनता ही देखील ISI एजंट आहे”

हमजाच्या या ट्विटनंतर काहींनी त्याचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी त्याला झोडपून काढलं आहे. हमजा हा भडक आणि उथळ विधानांसाठी प्रसिद्ध असून त्याच्या याच सवयीमुळे पाकिस्तानातील वृत्त माध्यम नियंत्रण प्राधिकरणाने त्याला एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यापासून रोखलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या