बॉलिवूडमध्ये येण्याआधी कतरिना मॉडेलिंग करायची. ती १७ वर्षाची असताना तिला पहिले मॉडेलिंग प्रॉजेक्ट मिळाले होते.
कतरिनाचे वडिल मोहम्मद कैफ हे कश्मीरी वंशाचे ब्रिटीश असून ते उद्योगपती आहेत. तर तिच्या आईचे नाव सुझेन असून ती वकील आहे.
तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला असून तिला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे.
बूम या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. तिचा हा चित्रपट फार चालला नाही.
एके काळी दबंग सलमानची जवळची मैत्रीण असलेल्या कतरिनाचे रणबीर कपूर बरोबरही सुत जुळले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. सध्या कतरिना सिंगल असून तिने कामात स्वत:ला बिझी ठेवलयं