
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल यांना वीसनगरमध्ये भाजप आमदाराच्या कार्यलयाची तोडफोड केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. वीसनगर न्यायालयाने आज या खटल्याप्रकरणी सुनावणी करताना हार्दिक पटेल यांना दोषी ठरवलं. तसंच हार्दिक पटेल सोबत लालजी पटेल, ए.के. पटेल या दोघांना देखील दोषी ठरवण्यात आलं असून दोन वर्षाचा तुरुंगवास आणि प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वात २०१५ मध्ये मेहसाणा जिल्ह्यातील वीसनगरमध्ये भाजपचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. या तोडफोडी प्रकरणी स्थानिक पोलिसांनी हार्दिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले होते. अडीच वर्ष हा खटला सुरू होता. अखेर आज या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली.
Mehsana: Visnagar Court pronounces Hardik Patel guilty in a case related to vandalising BJP legislator Rushikesh Patel’s office in Visnagar during 2015 Patidar protests. #Gujarat (file pic) pic.twitter.com/IB5PN67zkI
— ANI (@ANI) July 25, 2018
दरम्यान, निकालाची सुनावणी झाल्यानंतर हार्दिक पटेलच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच आपण सर्व अडथळे पार करू, अशा आशयाचं ट्विट हार्दिक पटेल यांनी केलं आहे.
किसी भी मुश्किल को उसके बनाये गए लेवल पर हल नहीं किया जा सकता, उस मुसीबत को उस लेवल से ऊपर उठने पर ही हल किया जा सकता है। इंक़लाब ज़िंदाबाद
— Hardik Patel (@HardikPatel_) July 25, 2018
Visnagar Court Hardik Patel found guilty in BJP mla office vandalize case























































