हरीश राणामुळे दोघांना मिळणार जीवनदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 13 वर्षे कोमात असलेला हरीश राणा याच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. हरीश अनंतात विलीन झाला असला तरी तो अवयव रूपाने जिवंत राहणार आहे. हरीश राणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी एक महत्त्वाचा निर्णय घेत हरीशचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

हरीशच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेत त्याचे नेत्रपटल आणि हृदयाची झडपे असे दोन अवयव दान केले. यामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे. हरीशच्या या दोन अवयवांमुळे एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी परत मिळण्यास मदत होईल, तर हृदयाच्या झडपमुळे गंभीर हृदयरोग असलेल्या पीडित व्यक्तीला निरोगी जीवन जगण्यासाठी मदत होईल. सुप्रीम कोर्टाने याच महिन्याच्या सुरुवातीला हरीश राणाला इच्छामरणाची परवानगी दिली होती. मागील 13 वर्षांपासून कोमात गेलेल्या हरीषच्या इच्छामरणासाठी त्याच्या पालकांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले होते. हरीशचा उपचार वैद्यकीयदृष्टय़ा करणे शक्य नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. हतबल झालेल्या आणि उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱया पालिकांनी कोर्टात इच्छामरणासाठी अर्ज केला होता. हरीष 2013 मध्ये इमारतीच्या तिसऱया मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर तो कोमात गेला होता. तेव्हापासून तो बिछान्यावर पडून होता.