T20WC 2021 ‘कॅप्टन’लाच दिला डच्चू, हर्षा भोगलेंच्या संघात तीन अष्टपैलूंना स्थान

हिंदुस्थानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरू होईल. या मालिकेनंतर यूएईमध्ये आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा पार पडेल. आयपीएलनंतर यूएईमध्येच आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे. बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करणार असून हिंदुस्थानचा संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. ही स्पर्धा जशी जवळ येत आहे, तशी क्रीडाप्रेमींचा उत्सुकता शिगेला पोहोचली असून अनेक दिग्गज या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा संघही निवडत आहे.

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी देखील आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी हिंदुस्थानच्या संघाची निवड केली आहे. मात्र त्यांनी आपल्या या संघातून श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झालेल्या ‘कॅप्टन’लाच डच्चू दिला आहे. नुकताच हिंदुस्थानचा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता आणि या दौऱ्यात शिखर धवन हिंदुस्थानचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने एक दिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली, मात्र टी-20 मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला.

हर्षा भोगले यांनी आपल्या संघात रोहित शर्मा, के.एल.राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार या फलंदाजांना स्थान दिले आहे. पाचव्या स्थानासाठी श्रेयस अय्यर आणि ईशान किशन हे दोन पर्याय त्यांनी दिले आहेत. तर यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतच्या नावावर मोहोर उमटवली आहे. तसेच हार्दिक पांड्या, वाशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जाडेजा या तीन अष्टपैलूंना त्यांनी आपल्या संघात घेतले आहे.

T20WC 2021 पृथ्वी शॉ, शिखर धवन बाहेर; दिग्गजाच्या संघात रोहितसोबत ‘हा’ खेळाडू सलामीला येणार

गोलंदाजीमध्ये फिरकीपटू म्हणून वरुण चक्रवर्ती आणि युझवेंद्र चहल या दोघांची निवड त्यांनी केली आहे. मात्र चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान दिलेले आहे. तसेच वेगवान गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार, दिपक चहर आणि जसप्रीत बुमराह यांची निवड हर्षा भोगले यांनी केली. तर चौथा गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी आणि टी. नटराजन असे दोन पर्याय दिले आहेत.

Tokyo Olympic हिंदुस्थानच्या कमलप्रीत कौरचा थाळीफेकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश

हर्षा भोगले यांनी निवडलेला संघ –

रोहित शर्मा, के.एल. राहुल, विराट कोहली (कर्णधार) सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर/ ईशान किशन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, वाशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा, दिपक चाहर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी/टी. नटराजन.

आपली प्रतिक्रिया द्या