Tokyo Olympic हिंदुस्थानच्या कमलप्रीत कौरचा थाळीफेकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश

टोकयो ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी आज थाळीफेकमध्ये हिंदुस्थानच्या कमलप्रीत कौरने जबरदस्त कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. कमलप्रीतने फायनल क्वालिफाय राऊनच्या तीनही भागात 60 मीटरच्या पुढेच थाळी फेकल्याने तिचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. 2 ऑगस्ट रोजी कमलप्रीतचा अंतिम सामना होणार आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कमलप्रीतने पहिल्या प्रयत्नात 60.29, दुसऱ्या प्रयत्नात 63.97 आणि तिसऱ्या प्रयत्नात देखील 63.97 मीटर कामगिरी केली. तिच्या क्वालिफायर ग्रुपमध्ये कमलप्रीत दुसर्या स्थानावर होती. एकीकडे कमलप्रीतने चांगली कामगिरी करत पदकाची आशा उंचावलेली असताना दुसरी कडे सीमा पुनिया ही थाळीफेकमध्ये तिच्या ग्रुपमध्ये सोळाव्या स्थानवर होती. त्यामुळे ती अंतिम फेरी गाठू शकली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या