तिजोरीत खडखडाट म्हणता… मग निधी कुठून आणणार? काँग्रेसचा सरकारला सवाल

काँग्रेसने पाच हजार कोटींच्या मंजुरीबद्दल सरकारवर टीका केली आहे. महायुती सरकार म्हणते तिजोरीत खडखडाट आहे, सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नाही मग हे पाच हजार कोटी आणणार कुठून, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सरकारकडे लाडकी बहीण योजनेला निधी नाही म्हणून सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग केला. मागील महिन्यात एसटी कामगारांना पगार देण्यास पैसे नव्हते. शेतकरी कर्जमाफीस पैसे नाहीत मग या घोषणांची अंमलबजावणी कशी करणार? चौंडी मंत्री परिषदेच्या बैठकीत केलेल्या घोषणासुद्धा जुमले ठरू नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला.