
पुण्यातील वाघोळीच्या मातीत रंगलेल्या 68 व्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम लढतीत नाशिकचा वाघ हर्षवर्धन सदगीरने पुन्हा एकदा डरकाळी पह्डली. बाहुबली प्रतिमेच्या महेंद्र गायकवाडला त्याने 4-3 अशा थरारक झुंजीत चीत करत मानाची चांदीची गदा हिसकावली. त्याने आक्रमकतेला संयमाची जोड देत डावावर वर्चस्व गाजवले आणि निर्णायक क्षणी सामना आपल्या बाजूला खेचला. या दणदणीत विजयासह तो दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ ठरला आणि ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा मान पटकावणारा राज्यातील सातवा बलाढय़ मल्ल बनला.






























































