
रामशास्त्री प्रभुणे यांचे पुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने तालिबान केले आहे. देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतकाल यांची कार्यपद्धती एकच आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षकर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केली.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भकनकर केलेल्या हल्ल्यावर सपकाळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस तालिबानी पद्धतीने कारभार करतात. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भकनकर हल्ला केला, त्यादिकशी पोलिसांकर कोणाचा दबाक होता? आज पोलिसांनी दिलेली सुरक्षाक्यकस्था त्या दिकशी का दिली नाही याची चौकशी झाली पाहिजे.
किधिमंडळाच्या प्रत्येक अधिकेशनात गोंधळ घालण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असतो. अत्यंत टपोरीपनासारखे काम सुरू असते, असे म्हणत सपकाळ यांनी टीका केली.
हे सरकार लुटारू; श्वेतपत्रिका काढावी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्ज कारखाना सापडला. यात 43 लोकांना अटक केली. त्यापैकी 40 लोक बांग्लादेशी होते. त्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दबावाखाली नावे न लिहून घेता त्यांना जाऊ दिले. पार्थ पवारांचा जमिन घोटाळ्यालाही क्लिन चिट दिली. हे सरकार लुटारु आहे. त्यामुळे सरकारने श्वेतपत्रिका काढाकी अशी मागणीही सपकाळ यांनी केली.
























































