लग्नाच्या रात्री नवऱ्याचं ‘रूप’ पाहून नवरीला धक्काच बसला, थेट महिला आयोगाकडे तक्रार

प्रत्येक व्यक्ती लग्नाची गोड गुलाबी स्वप्न पाहत असते. लग्नानंतर जोडप्याची पहिली रात्र देखील उत्सुकतेची असते. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री जोडिदाराचे सत्य समोर आले तर त्यापेक्षा दु:खदायक आणि वेदनादायक दुसरे काहीही असू शकत नाही. असेच एक प्रकरण आता समोर आले आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री वधुला नवऱ्याबद्दल समजलेल्या सत्यामुळे तिचा संसार उद्ध्वस्त झाला. नवऱ्याच्या विचित्र स्वभावामुळे पहिल्याच दिवशी तिने माहेर गाठत तिच्या पालकांसमोर सत्य उघड केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणामध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा पार पडल्यानंतर वधू आपल्या सासरी गेली. घरच्यांच्या संमतीने हा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र वधूने ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालविण्याची स्वप्न पाहिली होती त्याचे खरे रूप पाहून तिला धक्का बसला. हरयाणातील यमुनानगर येथे राहणाऱ्या एका तरुणाशी या तिचे लग्न झाले होते. नववधूच्या म्हणण्यानुसार तिचा नवरा समलिंगी असून तो रोज रात्री जागून मुलींसारखा मेकअप करतो, असा दावा तरुणीने केला आहे.

नवरा समलिंगी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वधूने सासरच्या मंडळींवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. लग्नात लाखो रुपये खर्च केल्याचे वधू व तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. तसेच मुलाला एक आलिशान कारही दिल्याचे सांगितले. या लग्नात 70 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला असल्याचे नववधूच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. लग्नापूर्वी वधू आणि वराला एकटे भेटायची किंवा बोलावयाची संमती नव्हती. लग्नानंतर रात्री लवकर झोपण्याचे कारण सांगून नवरा वधूसोबत बोलणे टाळत असे. यामुळे सासरच्या माणसांनी फसवणूक केल्याचा आरोप करत वधू व तिच्या कुटुंबीयांनी याबाबत महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.