हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांची अखेर बदली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हाथरस येथील जिल्हाधिकारी प्रवीण पुमार यांची अखेर उत्तर प्रदेश सरकारने बदली केली आहे. प्रवीण पुमार यांच्यावर आता मिर्जापूरच्या डीएम पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर हाथरसच्या जिल्हाधिकारी पदी यूपी जल निगमचे अतिरिक्त प्रबंध निर्देशक रमेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने शुक्रवारी एपूण 16 सनदी अधिकाऱयांची बदली केली. त्यावेळी या बदल्या करण्यात आल्या आहेत. हाथरस बलात्कार प्रकरणानंतर प्रवीण पुमार यांची बदली करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर ही बदली करण्यात आली आहे. या 16 बदल्यांमध्ये अलावा गोंडा जिह्याचे मजिस्ट्रेट नितीन बंसल, नोएडच्या अतिरिक्त सीईओ श्रुती यांचीदेखील बदली करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.