Video – वादळी वारे व मुसळधार पावसामुळे महामार्गावरील चेकपोस्टचे नुकसान, 5 जखमी

1106

हातकणंगले येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे किणी पथकर नाक्यानजीकच्या तपासणी केंद्रावरील पत्रे उडाले. या दुर्घटनेत केंद्रातील पाचजण किरकोळ जखमी झाले. असून आठ लॅपटॉप, प्रिंटरसह नोंदवह्या खराब झाल्याने केंद्राचे मोठे नुकसान झाले.

किणी ( ता. हातकणंगले ) येथील पथकर नाक्यावर तात्पुरते पत्र्याच्या शेडमध्ये तपासणी सुरू होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे केंद्रावरील पत्रे उडाले व नजिकच्या शेतात उडून गेले आणि तपासणी केंद्र उध्वस्त झाले. सुरवातीपासून नोंदी असलेल्या वह्या,आठ लॅपटॉप, प्रिंटर खराब झाले. या दुर्घटनेत पोलीस उपनिरीक्षक अर्चना हंबीरराव पाटील यांच्यासह पाच कर्मचारी जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. यावेळी अर्धा तास तपासणी यंत्रणा बंद पडल्याने सुमारे तीस ते चाळीस वाहने तपासणी न करता गेली. मात्र ही वाहने पथकर नाक्यावरील सी.सी.टी.व्ही. मध्ये नमूद झाली आहेत. सव्वा सातच्या सुमारास वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी पथकर नाक्याचे दोन बूथ ताब्यात घेऊन वाहन चालकांसह प्रवाशांची नोंद घेऊन कोल्हापूर च्या सी.पी.आरमध्ये पाठविण्यास सुरू केले. इचलकरंजीचे प्रातांधिकारी डॉ. विकास खरात,तहसीलदार प्रदिप उबाळे यांनी घटनास्थळाला भेट कंत्राटदारास नवीन तपासणी केंद्रासाठी मंडप उभारणीच्या सुचना दिल्या

आपली प्रतिक्रिया द्या