हातकणंगले येथील वादळी वाऱ्यात उध्वस्त झालेला तपासणी नाका पुन्हा कार्यरत झाला.

512

हातकणंगले येथील किणी -घुणकी परिसरात काल झालेल्या वादळी वारा व पाऊस यामुळे उध्वस्त झालेला किणी येथील तपासणी नाका प्रशासनाच्या जोरदार प्रयत्नामुळे अवघ्या १२ तासात दुप्पट क्षमतेने सुरु झाला आहे . कोरोनाच्या संसर्गा पासून कोल्हापूर जिल्हा सुरक्षित रहावा या साठी इथे दिवस -रात्र धडपडणारे प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कालपासून मेहनत घेत हा नाका पूर्ववत केला. दरम्यान राज्यभरातून प्रचंड संख्येने येणाऱ्या प्रवाशांमुळे या नाक्याला सध्या जत्रेचे स्वरूप आले आहे .

काल सायंकाळी किणी परिसरात झालेल्या वादळी वारा व पावसात कणे गांव ( जि सांगली ) व किणी टोल नाक्यावरील तपासणी नाका पूर्णता उद्ध्वस्त झाला . इथे काम करणारे पोलिस व इतर कर्मचारी जखमीही झाले . याचा फायदा घेत काही महाभाग भूमीपुत्र सुसाट सुटले . मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रथमता वडगांव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप काळे यांनी स्वःता सर्व सूत्रे हाती घेत अवघ्या अर्ध्या तासात परत तपासणी नाका सुरु केला . सर्व प्रवाशांची प्रवेशपत्रिका खातरजमा करत त्यांना हस्तलिखीत टोकन देत प्रक्रिया सुरु केली. रात्री उशीरा जिल्हाधीकारी दौलत देसाई यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली . तर परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून तपासणी नाका उभारणी व कार्यक्षम करणेबाबत सूचना केल्या . त्या नंतर आपत्ती व्यवस्थापनाचे निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी रात्री उशीरापर्यंत ठाण मांडत व शुक्रवारी सकाळपासून तहसिलदार प्रदिप उबाळे, सार्वजनीक बांधकामचे अभियंता के .डी.मुधाळे मंडल, अधिकारी वनिता खाडे व इतर कर्मचारी यांच्या मदतीने दोन्ही तपासणी नाके दुप्पट क्षमतेने म्हणजे नऊ बुथ कार्यरत केले . तर सार्वजनीक बांधकाम खात्याचे अधिकारी यांच्या देखरेखी खाली मजबूत असे दुसरे बुथ ऊभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे . हे बुथ उदया सकाळ पासून सर्व अद्यावत सुविधांसह कार्यरत होईल असा विश्वास येथे कार्यरत असणारे अधिकारी यांनी व्यक्त केला .

आपली प्रतिक्रिया द्या